आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या नागपूर जिल्ह्यात टोळधाड परत आली आहे. मध्यंतरी ही टोळधाड भंडारा जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे सरकली होती. कृषी विभागाते बुधवारी पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत रामटेक तालुक्यातील अजनी गावात ड्रोनद्वारे फवारणी करून टोळधाड पळवून लावली. तिथून टोळधाड मौदा तालुक्यातील मोहाडी गावात थांबलेली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितले. राज्यात पहिल्यांदाच टोळधाड पळवून लावण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे शेंडे यांनी सांगितले. हा ड्रोन पुण्याहून कृषी विभागाने पाठवला आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी आले असता हा ड्राेन पाठवण्यात आला होता.
दहा किमी लांब आणि दोन किमी रूंद टोळधाड तिच्या मार्गातील सर्व प्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करून संपवून टाकते. या किडीचे थवे १२ ते १६ किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने उडतात. टोळधाड दिवसभर हवेच्या दिशेने उडून जाताना दिसेल. वाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही एक महत्त्वाची कीड असून जेव्हा ही कीड समूहाने आढळून येते तेव्हा ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते वाळवंटी टोळ आपली अंडी रेतीमध्ये १० ते १५ सेंटिमीटर आत समूहाने घालतात. एक मादी साधारणत दीडशे ते दोनशे अंडी घालते. सर्वसाधारणपणे दहा ते बारा दिवस दिवसात उबवतात. पिल्लावस्था २२ दिवसात पूर्ण होते आणि प्रौढावस्था लांबपर्यंत उडून नुकसान करते.
ही घ्या खबरदारी
शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करावा. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी कीडे झाडाझुडुपात जमा होऊन बसतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्याने नियंत्रण करता येते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित कीटकनाशक पंधराशे पीपीएम ३० मिली किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.