आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र चपळगावकर यांचा आगळावेगळा पायंडा:साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अचानक विद्राेहींच्या मंडपात!

वर्धा / पीयूष नाशिककर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला विराेध म्हणून सुरू झालेल्या विद्राेही साहित्य संमेलनाच्या मांडवातच ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांनी हजेरी लावली. यामुळे मात्र साहित्यिक वर्तुळात आणि साहित्य संमेलन परिसरात एकच चर्चा सुरू हाेती.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्यातून उमटणाऱ्या विचारांना आणि काेट्यवधी रुपयांच्या आयाेजनाला विराेध म्हणून १७ वर्षांपूर्वी विद्राेही सांस्कृतिक चळवळीतून विद्राेही साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. वर्धा येथील स्वावलंबी शिक्षण संस्थेच्या मैदानावर ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. त्याच्या मागेच सर्कस मैदानात १७ वे विद्राेही मराठी साहित्य संमेलन सुरू आहे.

संमेलनाचे दुपारी उद्घाटन झाल्यानंतर अचानकच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आणि सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अभय बंग यांनी विद्राेही साहित्य संमेलनाच्या मंडपात हजेरी लावली. विद्राेही संमेलनाचे संंयाेजक आयाेजक किशाेर ढमाले यांनी दोघांनाही यांना सन्मानाने मंचाच्या एकदम पुढील साेफ्यावर जागा करून दिली.

यापूर्वीही स्वागताध्यक्षांची हजेरी : यापूर्वी साेलापुरात ८ वे विद्राेही मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. त्या वेळी ७९ व्या अ.भा. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव ढाेबळे यांनीही विद्राेही साहित्य संमेलनाच्या मंडपात हजेरी लावली हाेती.

बातम्या आणखी आहेत...