आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परकीय आक्रमणामुळे आयुर्वेदाचा प्रसार थांबला, आता मान्यता:आयुर्वेद पर्व आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत सरसंघचालकांचे मत

नागपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदेशींच्या आक्रमणामुळे आयुर्वेदाचा प्रसार रोखला होता. आता आयुर्वेदास पुन्हा मान्यता मिळत आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्याची वेळ आली आहे. आयुर्वेदास जागतिक मान्यता देण्यासाठी पाऊल उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने तीनदिवसीय “आयुर्वेद पर्व’ आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पूर्व नागपुरातील सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन भागवत यांच्या हस्ते झाले. या वेळी भागवत बोलत होते. वर्तमानात जगभरामध्ये अनेक उपचार पद्धती प्रचलित आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. यापैकी आयुर्वेद ही अस्सल भारतीय उपचार पद्धती म्हणून जगभरात ओळखली जाते. मध्ययुगीन कालखंडापर्यंत देशात आयुर्वेद ही एकमेव उपचार पद्धती प्रचलित होती.

आयुषची बाजारपेठ २३ अब्ज डॉलरवर : सोनोवाल या क्षेत्रात जे विद्यार्थी, संशोधन, निर्माते, वैद्य आहेत, त्या सर्वांनी एकत्रितपणे भविष्यात असा कार्यक्रम आखावा ज्यामुळे विश्वात नेतृत्व करू शकू, अशी अपेक्षा आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या वेळी व्यक्त केली. २०१४ पर्यंत आयुष उद्योगाची बाजारपेठ ३ अब्ज डॉलर होती. ८ वर्षांत जागतिक पातळीवर वाढून ही १८.१ अब्ज डॉलरची झाली. येत्या वर्षापर्यंत ही वाढून २३ अब्ज डॉलर होण्याची शक्यता असल्याचे सोनोवाल म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...