आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांशी बोलतील चंद्रपूर वन प्रबोधनीतील वृक्ष:झाडावरील क्यूआर कोडचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार केले लोकार्पण

नागपूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘वनस्पतींना संवेदना असतात’ किंवा झाडांनाही जीव असतो याचा शोध जगदीशचंद्र बाेस यांनी लावला. एकदिवस संवेदना असणारी झाडे आपल्या भाषेत आपल्याशी खरोखरच बोलायला लागली तर किंवा जंगलातले सारे मुके प्राणी "ए भाऊ, जरा ऐक ना' म्हणत स्वत:विषयी सांगायला लागले तर काय मजा येईल ना असा विचार माणूस नेहमी करतो.

आता केवळ झाडेच नाही तर संपूर्ण चंद्रपूर वन प्रबोधनीतील झाडे पर्यटकांशी बोलणार आहे. तेही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेत! राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी चंद्रपूर वन प्रबोधनीमधील झाडांना लावलेल्या क्यूआर कोडचे लोकार्पण केले.

झाड सांगेल स्वत:विषयी...

यासाठी ॲप सर्वप्रथम पर्यटकांना डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागेल. नंतर याच ॲपच्या माध्यमातून इंग्लिश, मराठी, आणि हिन्दी यामधून आपली आवडीची भाषा निवडायची आहे. ही निवडल्या नंतर पर्यटकला आपले नाव सांगायचे आहे, आणि त्यानानंतर ज्या झाडाची किंवा ईतर कोणत्या गोष्टीची माहिती हवी आहे तिथे असलेला क्यूआर कोड स्कॅन करायच आहे. त्या नंतर सगळी माहिती फोनवर दिसेल. झाड किंवा पक्षी बोलायला सुरुवात करील. या ॲपमध्ये अकादमी परिसरातील झाडांची माहिती आहे. हे ॲप एकदा इंस्टॉल केल्यावर विना इंटरनेट सुद्धा वापरू शकतो.

‘टॉकिंग ट्री’ म्हणजेच बोलणारे झाड असा हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत चंद्रपूर वन प्रबोधनीच्या परिसरातील विविध प्रजातींची झाडे मोबाईलद्वारे ओळखता येऊ शकणार आहे. तसेच प्रत्येक प्रजातीची सविस्तर माहिती दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वन प्रबोधनी परिसरातील प्रत्येक झाडावर पाटी स्वरुपात क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. ‘टॉकिंग ट्री’ या मोबाईल ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित झाड स्वत:बद्दल विविध भाषेमध्ये माहिती देणार आहे. वन प्रबोधनी परिसरात मोठ्या प्रमाणात वन व वनेत्तर प्रजातींची झाडे असून या ॲपच्या वापरामुळे परिसरातील जैव विविधतेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणे शक्य होणार आहे.

क्यूआर कोडचे लोकार्पण केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, विसापूर येथे तयार होणा-या बॉटनिकल गार्डनमध्येही वन विभागाने हा उपक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच या उपक्रमाचा विस्तार गंगोत्रीप्रमाणे करण्यासाठी वन विभागाने नियोजन करावे. झाडावर क्यूआर कोडची अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल वनमंत्र्यांनी प्रबोधनीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...