आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. हेमंत नागदिवे यांचे निधन:उद्या अंत्यसंस्कार, राज्याचे माजी कलासंचालक अन् "रूपी' चिन्हाचे होते निवडकर्ते

नागपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"रूपी'चे एक निवडकर्ते, राज्याच्या कला संचालयालयाचे माजी कलासंचालक, जे. जे. स्कूल आॅफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्रा. हेमंत नागदिवे यांचे नागपूर येथे बुधवारी (15) कर्करोगाने निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

उद्या अंत्यसंस्कार

"रूपी' या रूपयाच्या प्रातिनिधीक चिन्ह निवड समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून रिझर्व्ह बँकेने त्यांची निवड केली होती. उद्या गुरूवारी (ता. 16) सकाळी 11 वाजता वैशाली नगर निर्वाण घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

साहित्य क्षेत्राशी संबंधित

साहित्य क्षेत्राशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध हाेता. 1076 साली नागपूर येथे झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलन प्रसंगी दलित चित्रकला प्रदर्शनीच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांच्या कलात्मक कॅलिग्राफीने सजली होती. नागपुरातील "मुक्तीवाहिनी'शी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांचे कलाविषयक चिंतन पुस्तकरूपात येण्याचे आता राहून गेले आहे.

अक्षरलिपी क्षेत्रातील तज्ज्ञ

नागपूरच्या साैंदर्यीकरणात त्यांची महत्वाची भूमिका होती. गोवारी स्मृतिस्थळाचे सौंदर्यीकरण त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले. संविधान चौकातील डाॅ. आंबेडकर पुतळा परिसरातील म्युरल्सही त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले. अक्षरलिपीच्या क्षेत्रातील ते तज्ज्ञ होते. नवनवीन अक्षरांचे नमुने तयार करून देवनागरी तसेच गुजराती लिपीला अक्षरलेणे प्रदान केले.

बातम्या आणखी आहेत...