आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Former Chief Minister Devendra Fadnavis's Announcement If OBC Does Not Get Reservation, I Will Retire From Politics ; News And Live Updates

भाजपचे जेलभरो आंदोलन:​​​​​​​ओबीसी आरक्षण मिळवून दिले नाही तर राजकारण संन्यास घेईन - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंदोलनात युवक काँग्रेसचे बॅनर

आमच्या हाती सूत्रे दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ. आरक्षण मिळवून दिले नाही तर राजकारण संन्यास घेईन, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या वतीने राज्यभरात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चक्का जाम, जेल भरो आंदोलन करण्यात आले. पुण्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उग्र आंदोलन केले.

नागरपुरात व्हेरायटी चौकात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील काँग्रेस आमदाराचा मुलगा व भंडारा काँग्रेस जिल्हाध्यक्षानेच नागपूर उच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली असे सांगून काँग्रेस आणि आघाडी सरकारच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याचा अारोप केला. यावेळी व्यासपीठावर प्रदेेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. चक्काजाम आंदोलनानंतर फडणवीस यांनी स्वत:हून अटक करून घेतली.

आमच्या हाती सूत्रे दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ. नाही दिले तर राजकारण संन्यास घेईन, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. यांच्या बाजूने काही विचारवंत चांगले आहेत. तर काही बाजारू आहेत. हे बाजारू विचारवंत आता एका सूरात मोदींनी इम्पेरिकल डाटा दिला नाही असे एका सुरात गातील, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसच ओबीसी आरक्षणाची खरी मारेकरी आहे.

आंदोलनात युवक काँग्रेसचे बॅनर
युवक काँग्रेसचा पदाधिकारी अक्षय हेटे याने भाजपच्या बॅनरवर लावलेल्या एका बॅनरमुळे आंदोलनात खळबळ उडाली. “जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी’ “जय ओबीसी’ असे लिहिलेल्या बॅनरवर पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची छायाचित्रे लावली होती. व्यासपीठावरून हे बॅनर काढून टाकण्याचे अावाहन केल्या नंतर एका कार्यकर्त्याने उड्डाणपुलावर जाऊन बॅनर काढले.

बातम्या आणखी आहेत...