आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्येला जाण्याची ही योग्य वेळ नव्हे:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणी अयोध्येला जाण्याला आमचा विरोध नाही. पण राज्यात अवकाळी पावसाने कहर केलेला असताना व शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाणे योग्य नाही. त्यांनी अयोध्येला जाण्याची ही योग्य वेळ नव्हती, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी येथे पत्रपरिषदेत केली.

देशमुख म्हणाले, विदर्भ, मराठवाडा व कोकणासह राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गहू, कांदा, मिरची, निंबू, संत्रा व आंब्याचे नुकसान झाले आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही हातचा गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले आहेत.