आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसच्या चार युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांपैकी चार तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार 5 रोजी सकाळी घडली. हे सर्व जण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे रहिवासी होते. ते त्यांच्या कुटुंबीयांसह दर्शनासाठी आले होते. घटनेच्या वेळी 9 लोक गाडीत बसून होते. तर चौघे नदीत पोहण्यासाठी उतरले.

परंतु, नदीच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. ते पाहून गाडीतील परत एक तरूण त्यांना वाचवण्यासाठी धावला असता तोही बुडून मरण पावला. कन्हान नदी, अम्मा का दर्गा, जुनी कामठी येथे हे पाच तरूण पोहायला गेले होते. मृतकांमध्ये सय्यद अरबाज (वय 21), ख्वाजा बेग (वय 19), सप्तहीन शेख (वय 20), अय्याज बेग (वय 22) आणि मो. आखुजर (वय 21) यांचा समावेश आहे.

मृतकांचा स्थानिक पथकामार्फत शोध सुरू असून नदीला प्रवाह जास्त असल्या कारणाने तहसीलदार, पारशिवणी यांनी एसडीआरएफ पथकाची मागणी केलेली आहे. वृत्त लिहीपर्यत एकही मृतदेह हाती लागला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...