आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांच्या विरूद्ध सक्करदरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे विद्यमान सचिव ताज अहमद अली अहमद सय्यद (वय ५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार (वय ६८) व सचिव इक्बाल इस्माईल बेलजी (वय ५०) यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यमान सचिवांनी दिलेल्या तक्रारीत तत्कालीन अध्यक्ष शेख हुसेन व सचिव इक्बाल इस्माईल बेलजी यांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता तसेच कोणतेही लेखा परीक्षण न करता स्वत:च्या खात्यावर मोठी रक्कम वळती केली. शेख हुसेन यांनी १ कोटी ४८ लाख तर इक्बाल इस्माईल बेलजी याने ११ लाख ५२ हजार २६० रूपये वळते केले. शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीला सामोरे गेल्याच्या निषेधार्थ नागपुरात ईडी कार्यालयासमोर धरणे देत निदर्शने केली होती. तेव्हापासून ते भाजपच्या रडारवर होते.

बातम्या आणखी आहेत...