आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:नोकरीच्या आमिषाने 11 जणांची 68 लाखांची फसवणूक

नागपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखरेख या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन ११ जणांची ६८ लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी वाठोडा ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी अटकेच्या भीतीने फरार झाले असून त्यांच्या अटकेसाठी पथके पाठवण्यात आली आहेत.

नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील शेखर दशरथ बोरकर (२७) हे नोकरीच्या शोधात होते. दरम्यान, ते वाठोडा भागातील आशिष गोस्वामी व कविता गोस्वामी यांच्या संपर्कात आले. बोरकर यांच्यासारखेच नोकरीच्या शोधात असलेले त्यांचे मित्रही गोस्वामी दांपत्याने टाकलेल्या जाळ्यात अलगद फसले. त्यांना दक्षिण मध्य रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखभाल पदावर नोकरीवर लावून देतो असे सांगितले. त्यानंतर बोरकर यांच्या मेल आयडीवर बनावट नियुक्तिपत्रही पाठवले व त्यांच्याकडून वेळोवेळी फोनपे, गुगलपेद्वारे १० लाख रुपये घेतले. याशिवाय त्यांच्या इतर मित्रांकडून वेळोवेळी ५८ लाख ३० हजार रुपये उकळले.

बातम्या आणखी आहेत...