आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपा वैद्यकीय आघाडी, कॅन्सर पेशंट अॅन्ड असोसिएशन आणि स्वस्थ वृक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते ४५ वयोगटातील महिला भाजपा कार्यकर्त्यांना मोफत सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन देण्याचा पायलट प्राेजेक्टचा शुभारंभ १७ जून रोजी राजीव नगर येथील महात्मे आय बँक हाॅस्पिटल येथे करण्यात आला. १९ जूनपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी सुमारे १५० महिला कार्यकर्त्यानी लस घेतली.
“शतायु कार्यकर्ता दीर्घायु भाजप’ असे या उपक्रमाचे नाव आहे. महिलांमध्ये अलिकडे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेता भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. गिरीश चरडे यांनी दिली. कॅन्सर एड फाऊंडेशन, मुंबईचे डॉ. धनंजया सारनाथ यांच्याकडून लस मोफत देण्यात आली आहे. कार्यकर्ते व नागरिकांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केले आहे. महिलांना नि:शुल्क सर्व्हायकल कॅन्सरची लस देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.