आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक विक्रमाचा प्रयत्न:अकोला-अमरावती मार्गाचे उद्यापासून अहोरात्र वेगवान काम;108 तासांत 75 किमी रस्ता करणार तयार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-अकोला हा ७५ किमीचा महामार्ग अवघ्या १०८ तासांत पूर्ण करण्याच्या विक्रमी कामाला उद्या शुक्रवारी सुरुवात होत आहे. यापूर्वी कतार येथे वेगाने रस्ते बांधकाम पूर्ण करण्याचा विक्रम झाला होता. कतारमधील कंपनीने ६ दिवसांत २५ किमीचा रस्ता बांधण्याचा विक्रम केला होता. या विक्रमाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड'मध्येही करण्यात आली होता. याच विक्रमाला उद्या मागे टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अमरावती वळण रस्त्यानंतर लोणी गावाजवळील मूर्तिजापूरच्या आधीच्या चौपदरी महामार्गावर हे अतिजलद बांधकाम केले जाईल. ५४ किमीपैकी एका बाजूच्या दोन लेनमधून ७५ किमीचा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. शुक्रवारी, ३ जून रोजी सकाळी ७ वाजता कामाला सुरुवात होणार आहे. ७ जून रोजी दुपारपर्यत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने अहोरात्र काम सुरू राहाणार आहे. त्यासाठी वाहतूक वळवण्यापासून मनुष्यबळापर्यतची सर्व व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक विलास ब्राह्मणकर यांनी दिली.

यापूर्वी बांधला होता सांगलीचा रस्ता

राजपथ इन्फ्रा कंपनीतर्फे अमरावती-अकोला या ७५ किमी मार्गाचे वेगाने काम करण्यात येणार आहे. यापूर्वी या कंपनीने सांगली, सातारा येथे २४ तासांत ३९ किमी रस्ता बांधला होता. 'इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड'मध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. अमरावती-अकोला महामार्गाचे काम यापूर्वी अनेक कंत्राटदारांनी अपूर्ण सोडले होते. तसेच कामाचा दर्जाही सुमार होता. या महामार्गाच्या विलंबाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर हा रस्ता पूर्ण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...