आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी 20 परिषद:विदेशी पाहुण्यांना दारिद्र्य दिसू नये म्हणून भिकाऱ्यांवर जमावबंदी,  नागपूर पोलिस प्रशासनाची कारवाई

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या २० ते २२ मार्च दरम्यान नागपुरात जी-२० अंतर्गत सी-२० परिषद होत आहे. या निमित्त पाहुण्यांचा प्रवास असलेला भाग चकाचक केला जात आहे. संपूर्ण मार्ग आणि परिसराचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण केले जात आहे. खास विदेशी झाडे लावली जात आहेत. पाहुण्यांना दारिद्र्याचे दर्शन होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांनी भिकाऱ्यांविरुरूद्ध जमावबंदी आदेश जारी केला आहे. आदेश जारी होताच पोलिस पकडतील म्हणून अनेक भिकाऱ्यांनी मूळ गावी पोबारा केला तर काहींना पकडून त्यांच्या गावी सोडण्यात आले.

सी-२० परिषदेनिमित्त येणाऱ्या पाहुण्यांच्या सराबराईची खास तयारी केली जात आहे. विमानतळ परिसर नववधूसारखा सजवण्यात येत आहे. स्वागतासाठी व्हीआयपी लाउंज तयार केला जात आहे. वर्धा रोड ते दीक्षाभूमी दरम्यान चौकात भिकारी भीक मागतात. विशेषत: लहान मुले अनवाणी भीक मागतात. नेमका हाच पाहुण्यांचा मार्ग राहाणार आहे. त्यांच्या दृष्टीला भिकारी पडू नयेत म्हणून सीपींनी जमावबंदी आदेश काढला.

तृतीयपंथीयांवरील कारवाईनंतर आता चौकाचौकांतील भिकाऱ्यांविरुद्धही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयाने नागपूरकरांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात भीक मागणाऱ्यांची संख्या अचानक वाढली होती. पंचशील चौक, शंकरनगर, लॉ कॉलेज चौक, खामला, सेंट्रल एव्हेन्यू, चितार ओळ, मानेवाडा, छत्रपती चौक, सोमलवाडा चौकांसह अनेक ठिकाणी भिकारी दिसतात. तसेच अनेक भागातील पदपथ व रस्तादुभाजकांवरही त्यांनी ताबा घेतल्याचे चित्र शहरात दिसून येते. भीक मागण्यासाठी चिमुकल्या मुलांचाही वापर करण्यात येतो. भिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी पोलिस विभागाकडे आल्या. याची दखल घेत आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले. हे आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहतील. एकटे किंवा जमावाने भीक मागणाऱ्यांसाठी हे आदेश लागू असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...