आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडचिरोलीमध्ये चकमक:पोलिसांनी अबूजमाडमध्ये उद्धस्त केला नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायाला गोळी लागल्याने एक जवान जखमी

भामरागड तालुक्यात छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम अबूजमाडमध्ये गडचिरोली पोलिस आणि सी-६० कमांडोजनी केलेल्या कारवाईत नक्षल्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्धस्त केला.

४८ तास चाललेल्या चकमकीत पायाला गोळी लागल्याने एक जवान जखमी झाला. या कारवाईत सुमारे ७० अधिकारी व जवान सहभागी झाले होते. या चकमकीत नक्षल्यांकडून काेणी जखमी झाल्याबद्दल माहिती मिळू शकली नाही. या संदर्भात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात अजून माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. जखमी जवानाच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले.

कोपर्शीच्या घनदाट जंगल परिसराने वेढलेल्या अबूजमाड येथे गडचिरोली पोलिस, सी-६० पथक व नक्षल्यांत चकमक सुरू होती. पोलीस कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात दोनवेळा गोळीबार झाला. घटनास्थळ घनदाट जंगल पर्वतरांगानी वेढलेला अबुझमाडचा परिसर आहे. रात्रीपासून या भागात गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० कमांडोचे नक्षलवाद्यांच्या विरोधात अभियान सुरु होते. ते नुकतेच संपले. नक्षलवाद्यांचा हल्ला जवानांनी परतवून लावला. जवानांच्या मदतीसाठी गडचिरोली पोलीस दलाचे हॅलीकॅाप्टर रवाना झाल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...