आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकिंग न्यूज:नक्षलवाद्यांची यादी समोर, मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवादी झाले होते ठार; 20 पुरुषांसह 6 महिला नक्षलवाद्यांचा समावेश

गडचिरोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री - Divya Marathi
मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री

शनिवारी नक्षलविरोधी कारवाईत गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाला आहे. त्यासह 26 नक्षलवाद्यांच्या नावांची यादी समोर आली आहे. कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या C-60 पथकाच्या जवानांनी शनिवारी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यामध्ये तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. आता या ठार झालेल्या नक्षलवाद्यांची यादी समोर आली आहे. या 26 नक्षलवाद्यांमध्ये एकूण 20 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे.

ही आहे 26 नक्षलवाद्यांची यादी

गडचिरोली जिल्ह्यातील आपत्ती चकमकीत टिपल्या गेलेल्या नक्षल्याचे मृतदेह गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. या सर्व मृतदेहांच्या कोरोना चाचण्या करून शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती आहे. वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. 26 मृत नक्षलयांमध्ये 20 पुरुष व सहा महिला नक्षल्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. यातील 16 नक्षलवाद्यांची ओळख पटली असून 10 जण अनोळखी आहेत. हे सर्व 10 लोक मिलिंद तेलतूंबडेच्या माध्यमातून दलममध्ये नव्याने भर्ती करण्यासाठी आणलेले रिक्रुट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्व ओळख पटलेले मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती जंगल परिसरात झालेल्या या चकमकीत राज्यातील नक्षल चळवळीचा सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह तीन मोठे नक्षल नेते मृत झाल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यासाठी मोठी तयारी चालविली आहे.

कोण होता सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे?

मिलिंद तेलतुंबडे हा आरोपी असून त्याला फरार घोषित करण्यात आले होते. त्याला माओवाद्यांचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. मिलिंदवर 50 लाखांचे बक्षीस आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात तो आरोपी असून फरार होता. तो आनंद तेलतुंबडे यांचे भाऊ आहेत. बंधूंचा काही संबंध नाही पण एजन्सीचे म्हणणे आहे की, मिलिंदने बंदी घातलेल्या संघटनेच्या चळवळीचा विस्तार करण्यासाठी आनंद यांच्या साहित्यांचा वापर केला. 1 मे 2019 रोजी झालेला आयईडी स्फोट मिलिंद तेलतुंबडे यांनी केल्याचा पोलिसांना संशय होता.

(इनपूट - हेमंत डोर्लीकर)

बातम्या आणखी आहेत...