आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गडचिरोलीत नक्षलवाद्यास अटक, विशेष अभियान पथकाच्या जवानांची कारवाई

गडचिरोली ( हेमंत डोर्लीकर)5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षल विरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे.

हेडरी पोलिस उपविभागाअंतर्गत जांबिया गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत सोमवारी गडचिरोली पोलिसांचे विशेष पथक सी-60 हे नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना गोपनिय माहितीच्या आधारावर नक्षलवादी अजय हिचामी यास अटक करण्यात आले असल्याचे पोलिस वार्तापत्रात म्हटले आहे. सदर नक्षवाद्याला कुठे आणि कशी अटक केली हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही.

पोलिस वार्तापत्रानुसार अजय हिचामी (30) राहणार झारेवाडा ता. एटापल्ली हा 2019 मध्ये गट्टा दलममध्ये भरती होऊन सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तो नक्षल्यांच्या एक्शन टीमचा सदस्यही होता. यावर्षी गट्टा व बुर्गी पोलिस मदत केंद्रावर नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा समावेश होता.

18 सप्टेंबर रोजी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी सडमेक याच्या खुनामध्ये सक्रीय सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यांच्यावर शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. त्याच्यावर तीन खुन, पाच चकमकी व एक दरोडा असे 9 गुन्हे दाखल आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षल विरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे.

बातम्या आणखी आहेत...