आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन विशेष:नांदेडच्या गगरानी दाम्पत्याने 5 वर्षात वाटली 90 हजार रोपे, गोदावरी नदी संसद संस्थेचा नि:शुल्क उपक्रम

अतुल पेठकर, नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्याचे आगमन होताच चाहूल लागते ती पावसाची. पण जून महिन्यात उष्णतेचा पारा चांगलाच तापला आहे. पाण्यासाठी वन्यप्राणी आणि माणसांचीही भटकंती आणि वणवण सुरू आहे. उन्हाळा आला की प्रत्येकाला हवी असते ती सावली. असे आसताना नांदेड येथील गोदावरी नदी संसद संस्था दर वर्षी घरी रोपे तयार करून शेतकऱ्यांना नि:शुल्क वाटप करते. नांदेड येथील गगरानी दाम्पत्याने 5 वर्षात 90 हजार रोपे तयार करून त्याचे नि:शुल्क रोपे वाटप केले.

नि:शूल्क रोपे वाटप

नांदेड येथील राम गगरानी व त्यांच्या पत्नी जयश्री गगरानी या दाम्पत्याने सव्वालाख रोपे वाटण्याचा संकल्प केला आहे. 5 वर्षात 90 हजार रोपे तयार करुन वितरण केले. आवळा, बेल, सीताफळ, रामफळ, आंबा, जांभूळ, चंदन, सागवान, शमी आदी वृक्षांच्या बीजापासून रोपे तयार करून ती वितरीत करतात. या शिवाय गोदावरी नदी संसद संस्थेसोबतही काम करतात. राम गगरानी हे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झाले आहे.

फळे तुम्ही खा, बीया आम्हाला द्या

नांदेड येथील गोदावरी नदी संसद संस्था गेली काही वर्ष पर्यावरणपूरक उपक्रम घेत आहे. "फळे तुम्ही खा, बीया आम्हाला द्या' या उपक्रमातंर्गत लोक त्यांनी खाललेल्या बीया संस्थेला आणून देतात. संस्थेचे सभासद घरोघरी त्याची रोपे तयार करतात आणि पावसाळ्यात वितरण करतात. या शिवाय सीडबाॅल तयार करून पावसाळ्यात प्रवास करताना ते घाट, दरी माथ्याने फेकतात, असे गगरानी यांनी सांगितले. एका घरी किमान 5 रोपे तयार केली जातात. आंबा, जांब, आवळा, चिंच अशी सर्व देशी झाडांची रोपे तयार केली जातात. वर्षभरानंतर प्रामुख्याने शेतकऱ्यांना वाटप केले जाते. यासाठी संस्थेतर्फे रोपे तयार करणाऱ्यांना काळी बॅग व बीज पुरवठा केला जातो. वर्षभरानंतर रोपे देतानाचे छायाचित्र ग्रुपवर पोस्ट केल्यानंतर नर्सरीचे ई-प्रमाणपत्र संबंधितांना दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...