आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेट्रोमध्ये जुगार:नागपूर मेट्रोच्या ‘सेलिब्रेशन आॅन व्हिल’मध्ये चक्क जुगार आणि पोल डान्स;व्हिडीओ व्हायरल

नागपूरएका महिन्यापूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक

प्रवासी मिळत नसल्याने उत्पन्न वाढीसाठी नागपूर मेट्रोने ‘सेलिब्रेशन आॅन व्हिल’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमातंर्गत बुक केलेल्या कार्यक्रमात चक्क मेट्रोत पाेल डान्ससह जुगार खेळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होताच जागे झालेल्या मेट्रो प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला आहे.

‘सेलिब्रेशन आॅन व्हिल’ उपक्रमातंर्गत मेट्राेत लग्नाचे वाढदिवस, वाढदिवस, हळदीकुंकु अशा कार्यक्रमांसाठी केवळ तीन हजार रूपयात तीन डबे एका तासासाठी मिळतात. बुधवारी रात्री शेखर शिरभाते नावाच्या व्यक्तीने वाढदिवस साजरा करण्यासाठी मेट्रो भाड्याने घेतली. मात्र, नंतर धावत्या रेल्वेत जुगाराचा डाव रंगला. शिवाय पोल डान्सरवर पैसे उधळण्यात आले. काही पाहुण्यांनी मेट्रोमध्ये थिल्लरपणा सुरू केला. यावेळी डान्सरकडून अश्लील डान्स करण्यात आला व त्यांच्यावर पैसे उडविले गेले. मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी या प्रकरणात कारवाई करणार असल्याचे सांगितले. यापुढे डिपाॅझिट म्हणून दुप्पट रक्कम घेण्यात येईल. तसेच नियम भंग करणाऱ्यांना कायमस्वरूपी प्रवास बंदी करण्यात येईल, असे हळवे यांनी सांगितले.