आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूकीवरून आजी-माजी पदाधिकाऱ्यांत संघर्ष:नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सच्या आमसभेत राडा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भातील 13 लाख व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना असलेल्या नाग विदर्भ चेम्बर ऑफ काॅमर्समध्ये शनिवारी आमसभा तसेच निवडणूकीवरून आजी व माजी पदाधिकाऱ्यांत चांगलाच संघर्ष‌ उफाळून आला.

विद्यमान अध्यक्ष अश्विन प्रकाश मेहाडीया यांच्यासह विद्यमान कार्यकारिणीच दुसऱ्यांदा निवडून आली.यामुळे संतप्त झालेल्या माजी पदाधिकाऱ्यांनी चांगलाच गदारोळ केला.दोन्ही बाजू हमरीतुमरीवर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. विद्यमान अध्यक्ष अश्विन प्रकाश मेहाडीया यांच्या एककल्ली कारभारा विरोधात माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्वात अकरा माजी अध्यक्षांनी सोमवार 5 डिसेंबर रोजी दुपारी हल्लाबोल आंदोलनही केले होते. मागील काही दिवसांपासून एनव्हीसीसीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्याचा स्फोट शनिवारी झाला. शनिवारी आमसभा व निवडणूक होती. विद्यमान अध्यक्ष मेहाडीया यांनी घाईगडबडीत काही मिनिटात आमसभा आटोपली. माजी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे काहीही ऐकून घेण्यात न आल्यामुळे ते बहिष्कार टाकून बाहेर पडले.

रविनगरस्थित अग्रवाल भवनात झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष सत्तारूढ पक्षासमोर हतबल झाला होता. सत्तारूढ पदाधिकाऱ्यांनी आमसभेत दादागिरी करीत सर्व प्रस्ताव चर्चा न करताच पारित केल्याचे आरोप केले.

निवडणूक प्रक्रिया पायदळी तुडवल्याचा आरोप माजी अध्यक्ष दीपने अग्रवाल यांनी सायंकाळी पत्रपरिषदेत केला. एनव्हिसीसीच्या आमसभेत पहिल्यांदा बाऊंसर नेमण्यात आले होते. तसेच पोलिस बोलावण्यात आले होते.

बाऊंसरचा उपयोग करून आमचा आवाज दाबण्यात आल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला. विद्यमान पदाधिकारी यांनी आमचे काही एक ऐकून घेतले नाही. बाऊसर आणि पोलिस आणून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आम्ही शांतपणे विचारणा करीत असताना आमसभा अक्षरशः गुंडाळली असा आरोप अग्रवाल यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...