आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंपर नोकर भरती:MPSC ऐवजी मेडिकल बोर्डच्या माध्यमातून 4500 जागा भरणार; आरोग्य मंत्री गिरीश महाजनांची घोषणा

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर राज्य सरकारने बंपर नोकर भरती करण्याची घोषणा केलीय. आगामी काळात लवकरच डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागा टीएसच्या माध्यमातून भरल्या जातील, अशी घोषणा बुधवारी आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय.

विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्याची तयारी सुरू केलीय. विशेषतः नागपूरमधील 'एनआयटी' भूखंड वाटप प्रकरण येत्या काळात गाजण्याची शक्यता आहे.

नेमकी घोषणा काय?

गिरीश महाजन यांनी आज नोकर भरतीची मोठी घोषणा केली. त्यात डॉक्टरांची तीनशे पदे भरली जाणार आहेत. शिवाय २८ टक्के पदे रिक्त आहेत. एमपीएससी (MPSC)मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही भरती करण्यासाठी सरकार मेडिकल बोर्ड तयार करणार असल्याचे महाजन म्हणाले.

हॉस्पिलचे अधिकार वाढवले

राज्य सरकारने औषध खरेदीमध्येही मोठा बदल केलाय. त्यात आता हाफकिन 70 टक्के टक्के औषध खरेदी करेल, तर हॉस्पिटल 30 टक्के औषध खरेदी करेल. हे प्रमाण पूर्वी अनुक्रमे 90 टक्के आणि 10 टक्के होते. आता हॉस्पिटलला औषधी खरेदीचे अधिक अधिकार दिलेत.

येथे व्हेंटिलर देणार

औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांना अनेकदा तात्काळ व्हेटिंलेर मिळणे शक्य होत नाही. हे पाहता या ठिकाणी लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही महाजन यांनी दिले.

'त्यांना' पदावरून हटवले

यवतमाळ जिल्ह्यातल्या वैष्णवी बागेश्वर या गरीब कुटुंबातील तरुणीचा केवळ व्हेंटिलेरट न मिळाल्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरांवर आरोप झाले. त्यानंतर सरकारने म्हैसेकर यांची समिती नेमली. रुग्णालयाचे डीन गुप्ता यांना तात्काळ कार्यमुक्त केले. आणि जे डॉक्टर सपकाळ व्हेंटिलर उपलब्ध करू शकले असते त्यांना पदावरून हटवल्याचेही महाजन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...