आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:भूतबाधेच्या शंकेतून आईवडिलांनी केलेल्या मारहाणीत बालिकेचा मृत्यू

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा वर्षीय मुलीवर भोंंदूबाबाच्या सल्ल्याने उपचार करत असतानाच एका अघोरी प्रथेचे पालन करत मुलीला जबर मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. आपल्या सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आईवडिलांनी तिची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली तिला जबर मारहाण केली. या जबर मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

नागपूरच्या सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे व रंजना चिमणे यांना सहा वर्षीय मुलगी होती. काही दिवसांपासून ती सतत आजारी होती. तिच्या हावभावांवरून भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना शंका होती. एका भोंदूबाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र काहीच फायदा

होत नव्हता. शेवटी शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाइकाने घरातच भूतबाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली.

बातम्या आणखी आहेत...