आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबसिडीची मागणी:पुस्तके वाचूनच पुरस्कार द्या, जाहीर केल्यानंतर परत घेऊ नका!

महात्मा गांधी साहित्य संमेलन नगरी, वर्धाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य संमेलनात विविध 10 ठराव संमत, पुस्तकांच्या किमती कमी होण्यासाठी कागदावर सबसिडीची मागणी

मराठी शाळा, पुरस्कार निवड समिती, ग्रंथालयीन कर्मचारी वेतन प्रश्न, प्रकाशकाचे प्रश्न असे आणि श्रद्धांजलीसह १० ठराव वर्ध्यातील ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आले आहेत. यात राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी ग्रंथांची निवड ते ग्रंथ वाचूनच करावी आणि िदलेला पुरस्कार परत घेऊ नये, असा महत्त्वाचा ठराव घेण्यात आला.

साहित्य संमेलनात विविध १० ठराव संमत, पुस्तकांच्या किमती कमी होण्यासाठी कागदावर सबसिडीची मागणी {ठराव क्रमांक १ : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर साहित्य, नाट्य, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील ज्या दिग्गज व्यक्तींचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना वंदनाचा ठराव घेण्यात आला. {ठराव क्रमांक २ : विदर्भ साहित्य संघाचे अध्वर्यू ज्यांंनी हे संमेलन घेण्याचा प्रस्ताव मांडला होता, ते कै. मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाबद्दल हा विशेष दुखवट्याचा ठराव मांडला गेला.

{ठराव क्रमांक ३ : राज्यातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत एकसूत्रीकरण असावे, त्यांना किमान वेतन कायदा सक्‍तीचा करावा, अशी मागणी करण्यात आली. (सूचक : अशोक बेंडखळे , अनुमोदक : रमेश वंसकर).

{ठराव क्रमांक ४ : पुस्तकांच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी प्रकाशकांना छपाई आणि कागद खर्चात सबसिडी देण्यात यावी. तसेच, त्यांना जीएसटीमधून वगळण्यात यावे, यासाठी प्रयत्न करावा. (सूचक : डॉ. नरेंद्र पाठक, अनुमोदक : प्रकाश पागे)

{ठराव क्रमांक ५ : कोणत्याही कारणास्तव राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित मराठी आणि सेमी इंग्रजी शाळांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये रूपांतर केले जाणार नाही. यासाठी विधिमंडळात कायदा करण्यात यावा. (सूचक : विलास मानेकर, अनुमोदक : प्रकाश पायगुडे)

{ठराव क्रमांक ६ : महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषा अस्तंगत होत आहेत. बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासनाने ‘बोलीभाषा विकास अकादमी’ स्थापन करावी. (सूचक : डॉ. दादा गोरे, अनुमोदक : प्रकाश होळकर)

{ठराव क्रमांक ७ : राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्ट क्रमांक १३ नुसार महाराष्ट्राबाहेरील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या समाविष्ट व संलग्न संस्थांना रु. ५ लाख अनुदान प्रतिवर्षी वित्तीय वर्षाच्‍या सुरुवातीला द्यावे. ( सूचक : डॉ. विद्या देवधर, अनुमोदक : पुरुषोत्तम सप्रे)

{ठराव क्रमांक ८ : बृहन्महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या अनेक शाळा आणि हैदराबादमधील मराठी साहित्य परिषदेतर्फे चालवण्यात येणारे मराठी महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. या शिक्षण संस्थांना शासनाने त्वरित अनुदान देऊन त्या चालू ठेवण्यास सहकार्य करावे. ( सूचक : डॉ. विद्या देवधर, अनुमोदक : अमृत केशव आकरे)

{ठराव क्रमांक ९ : म्हादई नदी प्रामुख्याने गोव्यातून वाहते. ती कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी वळवण्याचा प्रयत्न होत आहे. ही नदी वळवल्यास पाण्याची तीव्र टंचाई होईल. म्हणून ही नदी न वळवण्याचा विचार व्हावा, अशी विनंती केंद्र सरकारला करावी. (सूचक : रमेश वयस्कर, अनुमोदक : राजमोहन शेटिये)

{ठराव क्रमांक १० : पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी पुरस्कारासाठी मराठी ग्रंथांची निवड करताना, ते ग्रंथ व्यवस्थित वाचूनच निर्णय घ्यावा आणि पुरस्कार जाहीर केल्यानंतर शासनाने तो परत घेऊ नये. (सूचक : डॉ. मिलिंद जोशी,अनुमाेदक : किरण सगर

बातम्या आणखी आहेत...