आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळहळ:लग्न लावून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू, चालक पसार

गोंदिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नातेवाईकांचा लग्नसोहळा आटोपून घरी परतत असताना कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. ट्रकच्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वारासह 3 चिमुकले जागीच ठार झाले आहेत. ट्रकचालक मात्र पसार झाला.

गोंदियाच्या ढाकणी भागवत टोला रस्त्यावर हा भीषण अपघात घडला आहे. यात ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील आदित्य बिसेन (7 वर्ष), मोहित बिसेन (11 वर्ष), कुमेंद्र बिसेन (37 वर्ष) आणि आर्वी कमलेश तूरकर (5 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. हे कुटुंबीय दासगावहून नातेवाईकाच्या लग्नासाठी गोंदियातील पिंकेपार येथे गेले होते. लग्न लागल्यानंतर तीन्ही मुले आपल्या वडिलांसोबत मोटारसायकलहून दासगावला घरी परतत असताना हा अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत जखमीना रूग्णालयात दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर ट्रक चालकाविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.