आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंदियात डुकराचा लहान मुलावर हल्ला:घराबाहेर खेळत असलेल्या मुलाला गंभीर दुखापत, उपचार सुरु

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया येथे डुकराने एका लहान मुलावर हल्ला केला. यामध्ये बालक गंभीर जखमी झाले. ही घटना 13 मार्चची असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

गोंदिया परिसरात काही मुले खेळत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तेवढ्यात अचानक डुक्कर आले आणि 10 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. त्याने मुलावर अनेक वेळा हल्ला केला. दरम्यान, आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी येऊन डुकराला पळवून लावले, मात्र तोपर्यंत या हल्ल्यात बालकाला अनेक जखमा झाल्या. यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शहरात भटक्या जनावरांच्या वाढत्या संख्येने नागरिक चिंतेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोंदिया शहरात डुक्कर आणि भटक्या जनावरांची संख्या वाढत आहे. यापासून होणारा त्रास थांबविण्यासाठी येथील नागरिकांनी गोंदिया नगरपरिषदेकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...