आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंडवाना विद्यापीठ 9 वा दीक्षांत समारंभ:गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी 'लोकल टू ग्लोबल' वाटचाल करावी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

हेमंत डोर्लीकर (गडचिरोली)6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदवी घेतली, सत्कार झाला आता नोकरी किंवा व्यवसायाचा प्रयत्न करणार. यापूढे शिक्षणाची गरज नाही. असा विचार पदवीधारकांनी न करता यापूढेच खरे जीवन शिक्षण सुरू झाले. हे स्वीकारून स्वतःचा, गावाचा व पूढे जगाच्या विकासाची पायाभरणी आपल्या कामातून केली पाहिजे. या भूमिकेतून गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधारकांनी लोकल टू ग्लोबल व्हावे. असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंगळवारी गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात केले.

गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होऊ शकेल. हे सुत्र लक्षात घेऊन येथील विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून भविष्यात प्रयत्न केले तर गडचिरोली सह परिसराचा निश्चितच विकास होऊ शकेल. असेही ते म्हणाले. या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व.सुनिल देशपांडे आणि मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली.

गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन राज्यपाल कोश्यारी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्रा. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचीही उपस्थिती होती. या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व.सुनिल देशपांडे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली. स्व.सुनिल देशपांडे यांच्या वतीने श्रीमती निरुपमा देशपांडे यांनी ही पदवी स्विकारली.

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये मुलींच्या वाढत्या संख्येबाबत समाधान व्यक्त करुन स्त्रीशक्तीचा त्यांनी विशेषत्वाने गौरव केला. स्व. सुनिल देशपांडे आणि देवाजी तोफा यांच्यासारख्या ध्येयवादी व्यक्तींचे योगदान समाजासाठी मोलाचेही ठरल्याच्या उल्लेख त्यांनी आवर्जून केला. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागाचा शैक्षणिक विकासासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध आघाड्यावर प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करुन पालकमंत्री शिंदे म्हणाले की, कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाची गेल्या नऊ वर्षातील वाटचाल विषद केली.

समारंभात विज्ञान व तंत्रविज्ञान शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा, मानव विज्ञान शाखा, आणि आंतरविज्ञान शाखेतील सुवर्ण पदक प्राप्त, प्रथम गुणवत्ता प्राप्त, आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र आरेकर यांनी केले तर गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी आभार मानले. खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे आदींसह राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस प्रमुख अंकित गोयल आदी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...