आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:धान खरेदीतील 3 कोटी 77 लाखांचा घोटाळा उघड, अखेर 24 आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलिसा ठाण्‍यात गुन्हा दाखल

गोंदिया9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रामार्फत करण्यात आलेल्या खरेदीत गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील नेहरू सहकारी धान गिरणीमध्ये ३ कोटी ७७ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात संस्थेचे तत्कालीन संचालक केंद्र अध्यक्ष प्रशासक ग्रेडर यांच्यासह २४ आरोपींवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी रेखलाल छंदलाल टेंभरे याला गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असल्याने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात धान घेतले जाते. सन २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये गोरेगावच्या नेहरू सहकारी धान गिरणी या नोंदणीकृत क्र. १११ मार्फत दवडीपार व कवलेवाडा येथे धान खरेदी करण्यात आली. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या नावे बोगस धान खरेदी करून इतर खात्यात रक्कम भरण्यात आल्याची तक्रार मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर विशेष लेखा परीक्षक संगीता लोखंडे यांनी घोटाळ्याबाबत गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

बातम्या आणखी आहेत...