आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विदर्भ दौरा:राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विदर्भ दौऱ्यावर, सेवाग्राम आश्रमाला दिली भेट

वर्धा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली,दीड तास मुक्काम - राज्यपाल
  • राज्यपालांनी आश्रमात जेवणाचा स्वाद घेत ; ९ मीटर कापडाची केली खरेदी
Advertisement
Advertisement

राज्याचे राज्यपाल विदर्भ दौऱ्यावर असून,ते नागपूर येथील राजभवन येथे मुक्कामी असल्याने, दिनांक २६ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल झाले होते. आश्रम परिसराची माहिती जाणून घेतली. सोबतच जेवणाचा स्वाद घेत ९ मीटर कापडाची खरेदी करीत आश्रम परिसरात दीड तास घालवत चरख्यावर सुतकताई करण्यात आली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जिल्हा दौऱ्यावर होते.दिनांक २६ जुलै रोजी १२:१५ वाजेच्या सुमारास शहरात दाखल झाले.शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी सेवाग्राम आश्रमात जाऊन बा-बापूंची कुटी बाबत माहिती जाणून घेतली.बापूंच्या चरख्यावर सुतकताई करीत,आश्रम परिसराची पाहणी केली.आश्रमात असलेल्या गांधीजींच्या रसोडा मध्ये त्यांनी जेवणाचा स्वाद घेत १० मीटर कापड १ हजार ६२० रुपयांचा खरेदी करीत, आश्रमात दीड तास घालवला.आश्रमाचे अध्यक्ष टी एन प्रभू यांनी सूत माळ, हिंद स्वराज्य,इंडिया ऑफ माय ड्रीम्स,महात्मा गांधी यांची राज्यपाल कोश्यारी यांना पुस्तके भेट दिली.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिप्राय नोंदवत सेवाग्राम आश्रमात येण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती ती पूर्ण झाली असल्याचे सांगितले.

वर्धेतील गीताई मंदिर येथे भेट देऊन त्यांनी विनोबा भावे यांनी कोरलेल्या शिळेवरील गीताईच्या अध्यायाची पाहणी केली. तसेच जमनालाल बजाज यांचे संग्रहालय आणि विनोबा भावे यांनी भूदान चळवळी वेळी भारतभर केलेल्या भ्रमणाची येथे दर्शविण्यात आलेली माहिती जाणून घेतली. मगन संग्रहालयात चालत असलेले ग्रामद्योगाची आणि तेथील संग्रहालय याची माहिती घेतली. त्यांनी खादी विक्री केंद्राला भेट देत खादीचे मार्केटिंग कसे करता याबाबत विचारणा सुद्धा केली.

एम गिरी येथील बापू आणि बा यांच्या प्रतिमेस सूतमाळा अर्पण करून एमगिरीने विकसित केलेले ग्रामोपयोगी तंत्रज्ञान समजून घेत ,याचा प्रसार गावापर्यंत करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. पवनार आश्रम येथे गौतम बजाज यांनी आश्रमाची माहिती आणि विनोबांचे तत्वज्ञानाबात त्यांना सांगितले. येथील भगिनींशी त्यांनी संवाद साधत राम मंदिराची आणि येथे उत्खननात सापडलेल्या मूर्तीची पाहणी केली.

पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी शासकीय विश्राम गृह येथे सूत माळ, चरखा आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. येथे त्यांनी जिल्ह्याची कोरोना विषयक परिस्थिती बाबत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली.

यावेळी खासदार रामदास तडस , आमदार पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, नगराध्यक्ष अतुल तराळे सरपंच सुजाता ताकसांडे, व्यंकट राव, विभा गुप्ता उपस्थित होत्या.

*राज्यपालांनी नोंदविला अभिप्राय

पूज्य बापू व संत विनोभा की साधना स्थली सेवाग्राम मे आनेका सुअवसर मिला. सादगी , शांती ,सवात्मनिर्भयता का यहा सहज ही आभास होता है.इस पवित्र तिर्थस्थळी मे अधिक से अधिक किशोर व युवशक्तीका भ्रमण किया जाये तो नई पिढी पूज्य बापू के बताये मार्ग मे चलकर स्वच्छता, स्वदेशी,स्वभाषा एवम आत्मनिर्भर भारत के बापू के सपनो को साकार कर सकती है, प्रवचकोको एवम यहा के साधक साधना कर्मी बहनो को सादर प्रणाम

भगतसिंग कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र

Advertisement
0