आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांचा सल्ला:विद्यापीठांना संतांची, वैज्ञानिकांची नावे द्या

नागपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला महाराष्ट्राचे नेहमी कौतुक वाटते. कारण येथील विद्यापीठे कोणत्या ना काेणत्या संताच्या नावाने आहेत. त्यापासून एक विचार मिळतो. विद्यापीठांना एक तर संतांची किंवा वैज्ञानिकांची नावे द्यावीत. राजकारण्यांच्या नावात काय ठेवले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

नागपुरातील राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठाच्या शतकमहाेत्सवी वर्षाला गुरुवारी प्रारंभ झाला. या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. या वेळी “जीवनसाधना’ पुरस्कार सुप्रसिद्ध उद्योजक पुरुषोत्तम अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला. “शतदीप पर्व’ ही स्मरणिका या वेळी राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.

या वेळी राज्यपालांनी राजकारण्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठांवर अप्रत्यक्ष टीका केली. यापूर्वी आपल्याला अवसानघातकी व चुकीचा इतिहास शिकवला. आपण काहीच केले नाही. आपला गौरवशाली व देदीप्यमान इतिहास सांगितलाच नाही, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...