आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन:जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही, दिल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल - फडणवीस

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लागू केल्यास 1.10 लाख कोटींचा बोजा; यापुढे विनाअनुदानित शाळा नाही

जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही. कारण दिल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल, असे प्रश्नोत्तराच्या तासात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. जुनी पेन्शन योजना दिल्यास राज्यावर १ लाख १० हजार कोटींचा बोजा पडेल व राज्य दिवाळखोरीत निघेल. त्यामुळे शासन जुनी पेन्शन देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

यापुढे राज्यात विनाअनुदानित शाळा देणार नाही, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. २०१० मध्ये आपण २०% ऐवजी ४०% अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी घोषित, अघोषित आणि त्रुटी पूर्तता करूनही फक्त ३५० शाळा होत्या. आणि आता अनुदान देता-देता शाळांची संख्या ३ हजार ९०० इतकी झाली. या शाळांना अनुदान दिल्यास पुढील ३ वर्षांत ५ हजार काेटींचा बोजा तिजोरीवर पडेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...