आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून श्रद्धा वालकर हत्याकांड खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होईल याबाबत प्रयत्न केले जातील. तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अहवाल मिळवून विधिमंडळाच्या सभागृहासमोर ठेवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धा वालकरप्रकरणी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत विधानसभेत सोमवारी दिली. श्रद्धा वालकर प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी लव्ह जिहादसंदर्भात केलेल्या कायद्यांचा अभ्यास राज्य सरकार करत आहे. त्याचा अभ्यास करून आवश्यकता भासल्यास कायदा करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
श्रद्धा वालकर या तरुणीची केवळ हत्याच नाही तर मारेकऱ्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ठेवले. याविषयीचा प्रश्न अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. श्रद्धाचा तक्रार अर्ज मागे घेण्यामागे तत्कालीन शीर्षस्थ नेत्याचा दबाव पोलिसांवर होता काय? लव्ह जिहादविराेधी कायदा करण्याचा विचार आहे काय? असे प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अातापर्यंतच्या तपासात राजकीय वा बाहेरील व्यक्तीचा दबाव आढळून आला नसल्याचे सांगितले. मुलींना गुड टच बॅड टचचे प्रशिक्षण: शक्ती कायदा आणण्याबाबत सरकारची काय भूमिका आहे? आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीवर अनेक आक्षेप आहेत. भाईंदर पोलिसही अशा एका अंकिता बुगडिया प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे, याकडे प्रभू यांनी लक्ष वेधले.उपमुख्यमंत्र्यांनी मुलींना शाळेत गुड टच व बॅड टचचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले. शक्ती कायद्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
अाफताबचे ७० तुकडे केले तरी काही वाटणार नाही : अजित पवार छगन भुजबळ यांनी वालकर व पूनावाला यांचे समाज जाहीर करा असे म्हटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी चौकशी पूर्ण करून सभागृहासमोर माहिती ठेवण्याची मागणी केली. अाफताब पूनावाला याचे ३५ ऐवजी ७० तुकडे केले तरी काही वाटणार नाही इतका पूनावाला नालायक आहे. केंद्राने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा होईल असे प्रयत्न करावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. फडणवीस यांनी ही मागणी मान्य करीत अमित शहा यांच्याशी बोलून असे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.