आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबा नव्हे राक्षस:बाळंतपणासाठी आलेल्या मुलीच्या मुलीवर बलात्कार; दुसऱ्या घटनेत साडेचार वर्षांच्या मुलीवर अत्याचार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या मुलीच्या मुलीवर म्हणजे आपल्या नातीवर आजाेबानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. शहरातील एक महिला बाळांतपणासाठी माहेरी आली होती. तिला 14 वर्षांची मुलगी आहे. सोमवारी रात्री एका खोलीत महिलेचे वडील या 14 वर्षीय मुलीवरच जबरदस्ती करत असल्याचे महिलेला आढळले. त्यामुळे संतापलेल्या महिलेने सोमवारी रात्री कपिल नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आजोबांना अटक केली आहे.

साडेचार वर्षांच्या मुलीवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत चॉकलेटचे आमिष दाखवून साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये प्रताप नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. मात्र, आज ही घटना समोर येताच पोलिसांनी आरोपी बाॅबी जंगले (वय २५) याच्यावर भादंवि कलम ३७६ (ए) (बी), ५०६ (ब) पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

मुलांना एकटे सोडू नका

लॉकडाऊनमध्ये नागपूरमधील मुलांवरील गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, आता ही गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसत आहे. लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आई-वडीलांनी आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...