आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन:‘जय हरिविठ्ठल’ गजराने अन् वारकरी संप्रदायाच्या भजनांनी रंगली ग्रंथदिंडी

आशिष पावडे |महात्मा गांधी साहित्यनगरी, वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळून ग्रंथदिंडी काढण्यात आली. विविध शाळांतील शाळकरी मुलांनी वारकरी संप्रदायाच्या भजनांवर अप्रतिम नृत्य सादर करत दिंडीला सुरुवात करत साहित्यनगरीत दिंडीचा समारोप करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. साहित्य संमेलनाची सुरुवात सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाने करण्यात आली. शुक्रवारी (३ फेब्रुवारी) वर्ध्यातील साहित्यिकांनी व शाळकरी मुलांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत हार अर्पण करत पुतळ्याजवळून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. ग्रंथदिंडीमध्ये महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...