आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारूपयाच्या अवमूल्यनामुळेच कापूस, सोयाबीन, गहु, तुरीला हमीभाव मिळण्याची शक्यता आहे, हे अनेकांच्या लक्षात येणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे अशी माहिती कापूस प्रश्नाचे अभ्यासक व शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी दिली आहे.
कापूस, खाद्य तेल, डाळींवरचा आयात कर देशातंर्गत भाव वाढतात म्हणून सरकारने रद्द केला होता. परंतु आता जागतिक बाजारात डाॅलरमध्ये भाव कमी होत असल्याने आयात कर त्वरित लावावा. आजच्या भावाला महागाई म्हणू नये. कारण ही भाववाढ रूपयाच्या अवमूल्यनामुळे झाली आहे, याकडे जावंधीया यांनी लक्ष वेधले.
90 ते 35 टक्के फटका
पाकिस्तानातील अतिवृष्टी, चीनमधील कोरड्या दुष्काळामुळे जागतिक स्तरावर कापसाचे उत्पादन कमी येईल अशी चर्चा आहे. अमेरिकेतही कमी पावसामुळे उत्पादनात घट होणार असल्याच्या बातम्या होत्या. यामुळे जागतिक बाजारपेठेत कापसाच्या भावाला 90 ते 35 टक्के फटका बसण्याची शक्यता जावंधीया यांनी वर्तवली आहे.
कापसाची आवक सुरू
मागील वर्षी एक पाऊण्ड रूईचा भाव 1 डाॅलर म्हणजे 70 सेंटपर्यत वाढला होता. तो मध्यंतरी 1 डाॅलर म्हणजे 15 सेंटपर्यत घसरला होता. कमी उत्पादनाच्या बातमीमुळे 1 डाॅलरचा भाव 30 सेंटपर्यत वाढला होता. देशातंर्गत पंजाब व हरियाणाच्या बाजारपेठेत कापसाची आवक सुरू झाली आहे. प्रारंभी 9 ते 10 हजार रूपये प्रति क्विंटल असे भाव मिळाल्याने चांगले भाव मिळतील अशी आशा निर्माण झाली होती. परंतु ही आशा निराशेत बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
8 ते 9 हजार क्विंटल भाव
आजच्या अमेरिकेतील कापूस बाजारातील 1 पाऊंण्ड रूईचा भाव 1 डाॅलर 12 सेंटपर्यत घसरला आहे. हा भाव आणखी पडण्याची दाट शक्यता आहे. हेच भाव स्थिर झाले आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू झाली तरी प्रारंभी 8 ते 9 हजार रूपये क्विंटल भाव राहाण्याची शक्यता आहे.
अमेरिकन बाजारपेठ
यात सरकीचे भाव 3 हजार रूपये क्विंटल मिळण्याची शक्यता असून सोयाबीनच्या मंदीमुळे हे भाव आणखी खाली येण्याची शक्यता जावंधीया यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे 1 डाॅलर 12 सेंट प्रति पाऊण्ड हा रूईचा भाव अमेरिकन बाजारपेठेत 1994-95 मध्ये होता. त्यावेळी भारतातील कापूस उत्पादकांना 2500 ते 2700 प्रति क्विंटलचे भाव मिळाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.