आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण साजरी:निर्बंधमुक्तीनंतर नागपुरात प्रथमच गुढीपाडवा हर्षोल्हासात साजरा

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन वर्षे कोरोनात गेली. लोक अक्षरश: घरात बंद होते. सणवार, उत्सव बंद असल्याने आनंदही नव्हता. एक उदासीनतेची सावली मनावर होती. ही मरगळ २०२२ च्या गुढीपाडव्याने दूर केली. १ एप्रिलपासून केंद्र सरकारने सर्व निर्बंध हटवल्याने नागपुरात गुढीपाडवा हर्षोल्हासात साजरा झाला. लोकांच्या आनंदाला उधाण आले होते.

शहरात विविध सांस्कृतिक व धार्मिक संस्थांनी आयोजन केले होते. ढोलताशे, बँड पथकाच्या दणदणाटात गुढीपाडवा साजरा झाला. अनेक ठिकाणी शहर भगव्या पताकांनी सजवण्यात आले होते. तर मल्लखांब, लाठीकाठी अशा देशी खेळांची प्रात्यक्षिके काही ठिकाणी सादर करण्यात आली. नागपुरातील लक्ष्मीनगर चौकात सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून प्रभू रामाची पालखीत मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशे, बँड पथकाच्या दणदणाटाने परिसर दणाणून गेला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रारंभी त्यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी हनुमान चालिसा पठण, आरती, रामरक्षा पठण झाले. या वेळी बोलताना फडणवीस यांनी भगवे चैतन्य पाहून नवीन ऊर्जा प्राप्त होत असल्याची भावना व्यक्त केली. कोरोना नंतर पहिल्यांदा आपण सर्व इतक्या उत्साहाने नववर्ष साजरे करण्यासाठी एकत्र आलो. गुढीपाडव्यापासून रामनवमी उत्सवाची सुरुवात केल्याचे ते म्हणाले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...