आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनलॉक:राज्यातील जिम दोन दिवसांत सुरू होणार, नियम व अटींसह परवानगी देणार : विजय वडेट्टीवार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियमांचे पालन करून जिम सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय

राज्यातील जिम दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. गेल्या चार महिन्यांपासून व्यावसायिक आर्थिक अडचणींचा सामना करीत होते. त्यांना नियमांचे पालन करून जिम सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राज्यातील जिममालक व संचालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन जिम सुरू करण्याची मागणी केली होती, तर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंची व देवेंद्र फडणवीसांची मागणी रास्त होती, असे सांगितले.