आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनफोर्स मलेशिया या कट्टरपंथीयांचे कृत्य:प्रेषित अवमान प्रकरणी इशारा देण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखवून आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध देशात होत आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत त्याचे संतप्त पडसाद उमटले. ड्रॅगनफोर्स मलेशिया या कट्टरपंथीयांनी नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक केली आहे.

प्रेषित मोहंम्मद यांचा अवमान सहन करणार नाही, असा इशारा या कट्टरपंथीयांनी दिला आहे. जगभरातील मुस्लिम हॅकर्स, मानवाधिकार संघटना आणि कार्यकर्त्यांनी भारता विरूद्ध एकत्र येऊन कॅम्पेन उघडावे असे उघड आवाहन वेबसाईट हॅक करून दिलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.आम्ही भारताविरूद्ध शांत राहू शकत नाही, भारताला जगभरात उघडे पाडू आमचे हे विशेष अभियान आहे असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. या प्रकारानंतर विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेकांनी मुख्यमंत्री, नागपूर पोलिस आयुक्त, गृहमंत्र्यांना टॅग करीत कारवाईची मागणी केली आहे.

भाजपमधून निलंबित केलेल्या नेत्या नुपूर शर्मा, नविन जिंदल यांच्याविरोधात मुस्लिम समुदायाने औरंगाबाद, सोलापूर, नवी मुंबई, नगरसह ठिकठिकाणी निदर्शने करुन आपला रोष व्यक्त केला होता. जागतिक पातळीवरही त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर राज्यातील नागपूर शहरात हा प्रथमच सायबर अॅटॅक आहे असे दिसून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...