आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिनर डिप्लोमसी’:गडकरींच्या घरी जेवण केले, मात्र राजकीय बेत नव्हता : शरद पवार

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुपारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊ त्यांच्या निवासस्थानी जेवणही घेतले. उभय नेत्यांनी एकत्र केलेल्या भोजनामुळे काही “डिनर डिप्लोमसी’ तर झाली नाही ना याची उत्सुकता प्रत्येकाला होती. मात्र शरद पवारांनीच या बाबत पत्रकार परिषदेत माहिती दिल्याने या जेवणात कोणताही राजकीय बेत नव्हता हे स्पष्ट केल्याने चर्चेतील हवाच काढून घेतली.

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नागपूर उपकेंद्रासाठी प्रस्तावित जागेला भेट देण्यासाठी आलो असता गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या आग्रहास्तव विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे उपकेंद्र नागपूरमध्ये सुरू होत आहे,असे पवार यांनी सांगितले.

नागपुरात दीड वर्षात वसंतदादा शुगरचे उपकेंद्र सुरू केले जाणार मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड ऊस होतो. ऊसामुळे या भागातील कृषी अर्थव्यवस्था बदलून गेली आहे. विदर्भातही ऊस होऊ शकतो,असे सांगून येत्या एक ते दीड वर्षात हे उपकेंद्र उभारून ते पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे पवार यांनी सांगितले.