आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणारे अतिशय मूर्ख लोक आहेत. त्यांना शिवाजी महाराज कळलेलेच नाहीत. महान युगपुरुषाचे महत्व त्यांना समजलेले नाही. हे विकृत लोक आहेत. त्यामुळे अशा मूर्खांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही, अशी टीका राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहीर यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली. नागपुरात प्रथम नगरागमनानंतर ते बोलत होते.
काय म्हणाले अहीर ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत महाराजांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालेले आहेत. त्यामुळे पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी महाराजांचे महत्त्व वाढवलेले आहे. महाराजांबद्दल कोण काय बोलले, हे मी समक्ष ऐकलेले नाही. पण बोलण्याचा उद्देश तो नव्हता, असेही ते लोक म्हणत आहेत. तरीही तसंच ते बोलले असतील, तर ते चांगले नाही. कारण शिवाजी महाराज हे राज्यातील, देशातीलच नाही तर जगात मान असलेले व्यक्तिमत्त्व आहेत, असे हंसराज अहीर यांनी सांगितले.
धक्का लागू देणार नाही
ओबीसी आयोगाचा अध्यक्ष म्हणून विद्यमान ओबीसी प्रवर्गातील जातींना कसलाही धक्का लागू देणार नाही. मागासवर्गीयांच्या आरक्षणात कसलीही कपात होऊ देणार नाही त्यांचे संरक्षण व प्रगती करिता मी आयोगाचा अध्यक्ष आहे. अन्य कोणत्याही जाती ओबीसी मध्ये घेण्याचा अधिकार मला नाही, असे मत अहीर यांनी व्यक्त केले.
ओबीसी आणि मराठा बांधवांबाबत ताबडतोब निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. सरकारमध्ये विधिमंडळात जसे ठराव पारित होतात, त्याप्रमाणे आयोगाला निर्णय घ्यावे लागतात. हे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले जातात. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते. सद्यःस्थितीत देशभरातून 40 प्रस्ताव आलेले आहेत. या प्रस्तावांना तात्काळ न्याय द्यायचा आहे. मराठा आरक्षणाबाबत सध्याच काही सांगता येणार नाही. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल. आयोगाकडून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.