आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे उपस्थित राहावे लागण्याची शक्यता आहे.२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी अॅड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत उपस्थित राहावे लागू शकते. ते कामात व्यस्त असल्यास त्यांचे वकील बाजू मांडू शकतात, असेही सांगितलं जाते.
तरुणीचा दुसराच बनाव फडणवीस यांच्यावर १९९६ आणि १९९८ मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याचा आरोप आहे. या दोन्ही प्रकरणात त्यांनी जामीन घेतला होता. २०१९ च्या निवडणुकीत अर्ज भरताना त्यांनी या प्रकरणांची माहिती दिली नाही. उके यांनी या विषयावर जेएमएफसी न्यायालयात याचिका दाखल करून फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.