आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी:मध्य प्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीला नागपुरातून हेलिकॉप्टर

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपत्ती निवारण कार्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या विनंतीवरून तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागपुरातून दोन एमआय-१७, व्ही-५ हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी नागपूर वायु सेनेच्या तळावरून या दोन मीडियम लिफ्ट हेलिकॉप्टरने मध्य प्रदेशासाठी उड्डाण केले. मध्य प्रदेशातील विदिशा येथे हे तैनात राहील. यापूर्वी इंदूर येथेही पाठवण्यात आले होते.

कोणत्याही संरक्षण दलाची सध्याच्या काळात हेलिकॉप्टर शिवाय कल्पनाच करता येणार नाही असे हेलिकॉप्टरचे अनन्य साधारण महत्व आहे. कोणत्याही वातावरणात संचार करणे, २० किलोमीटर उंचीपर्यंत उड्डाण करणे, विविध शस्त्रांसह लढणे, लष्कराच्या जवानांची, लष्करी साहित्याची वाहतुक करणे, कोणत्याही ठिकाणी उतरणे, हवेत स्थिर रहाणे अशी विविध क्षमतेची बहुउद्देशीय हेलिकॉप्टर जगात अनेक संरक्षण दलांकडे आहेत.

एमआय-१७ ची आधुनिक आवृत्ती एमआय -१७ व्ही ५ ः साधारण १९९० च्या दशकात एमआय-१७ हेलिकॉप्टरचा संरक्षण दलात समावेश झाला. सध्या भारतीय वायू दलाकडे २०० पेक्षा जास्त एमआय-१७ कार्यरत आहे. यामध्येच एमआय-१७ ची आधुनिक आवृत्ती असलेले एमआय-१७ व्ही ५ हे १०० पेक्षा जास्त आहेत. तर सीमा सुरक्षा दलाकडे एकुण आठ एमआय-१७ आहेत. साधारण २००८ नंतर एमआय-१७ व्ही ५ या नव्या आणि आधुनिक हेलिकॉप्टरच्या आवृत्तीचा समावेश संरक्षण दलात करण्यात आला. रात्रीच्या वेळी किंवा दिवसा अत्यंत प्रतिकुल वातावरणात उड्डाण करण्याचे कसब हे एमआय-१७ व्ही ५ कडे आहे.

मूळ एमआय-१७ हेलिकॉप्टर बहुउद्देशीय ः देशातील अति महत्त्वाच्या म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यांना इच्छित स्थळी नेण्याची जबाबदारी ही एमआय -१७ वर आहे. याचबरोबर संरक्षण दलातील जवानांची, लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी, विविध लष्करी कारवाईसाठी याच एमआय-१७ चा वापर होतो. एवढेच नव्हे तर शोध आणि सुटकेच्या मोहिमेत तसेच पूर,अतिवृष्टीच्या काळात लोकांना वाचवणे, मदत पोहचवणे अशा नागरी मदत काळात अनेकदा एमआय-१७ हेलिकॉप्टरने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

बातम्या आणखी आहेत...