आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅरोल:कुख्यात डॉन अरुण गवळीला 5 दिवसांत शरण येण्याचे हायकोर्टाचे आदेश

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे गवळी पॅरोलवर नागपूर तुरुंगातून बाहेर

पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबत यापुढे कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नाही, असे सांगतानाच ५ दिवसांत नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कुख्यात डॉन अरुण गवळीला दिले आहेत. गवळीने २४ तासांमध्ये मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्यासंबंधीची परवानगी मागावी. तसेच ती परवानगी एका दिवसात मंजूर करून घ्यावी. त्यानंतर पुढील तीन दिवसांत गवळीने नागपूर गाठावे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे गवळी पॅरोलवर नागपूर तुरुंगातून जवळपास ४५ दिवसांसाठी बाहेर आला होता. त्याच दरम्यान राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला होता. त्यामुळे गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्यावेळी विनंती मान्य करून १० मेपर्यंत त्याच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. त्यानंतर मात्र त्याची विनंती फेटाळण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...