आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांची घोषणा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे केली. दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन व्हावे हा मुद्दा मांडला होता. राज्यातील मराठी भाषक जनतेची ही मागणी होती. हे विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसांत समिती स्थापन करण्यात येईल.

या समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यापीठ स्थापनेच्या हालचालींना अधिक वेग येईल, असे सामंत म्हणाले. मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी आता सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी राज्यात ‘मराठी विद्यापीठ’ स्थापनेला वेग देण्यात येईल, असे सामंत म्हणाले.

घोषणा आनंद देणारी
गेल्या ८५ वर्षांपासून दत्तो वामन पोतदारांपासून आमच्यापर्यंत सर्वांनी पाठपुरावा केलेले मराठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समितीची झालेली घोषणा आनंद देणारी आहे. या घोषणेबद्दल शासनाचे अभिनंदन. -श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी

बातम्या आणखी आहेत...