आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत 945 किमी सहापदरी बुद्ध सर्किट महामार्ग तयार करणार

नागपूर ​​​​​​​11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 हजार कोटींचा खर्च, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

पर्यटन क्षेत्र हे सध्या सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. पर्यटन क्षेत्राचा अधिक विकास आणि या क्षेत्राला चालना देण्यामुळे अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत पर्यटन क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे, याअंतर्गत बौद्ध धम्माच्या पवित्र स्थानांना जोडणारा ९४५ किमीचा बुद्ध सर्किट महामार्ग तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ‘दर्शनम वेबिनार’अंतर्गत ‘पर्यटन आणि धार्मिक क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी प्रल्हाद पटेल, मनोज किश्वर, ज्येष्ठ पत्रकार राकेश शुक्ला उपस्थित होते. पर्यटनात रस्त्यांची आवश्यकता प्राधान्याने असते.

धार्मिक स्थळांना जोडणारे किती रस्ते महामार्ग प्राधिकरणामार्फत जोडण्यात आले याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. १० हजार कोटी खर्च करून आम्ही बुद्ध सर्किट तयार करीत आहोत. ९४५ किमीचे ४ ते ६ पदरी महामार्ग या अंतर्गत बांधण्यात येत आहेत. यात लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर मार्गाचा विकास होणार आहे. बुद्ध सर्किटमध्ये बौद्ध धम्माच्या पवित्र स्थानांचा समावेश आहे. भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान, ज्ञान प्राप्त झाले ते स्थान, पहिला उपदेश आणि निर्वाण स्थान आदींचा समावेश आहे. बुद्ध सर्किट- बोधगया, नालंदा, राजगीर, वैशाली, कहलगाव, पाटणाचा समावेश आहे. विस्तारित धर्मयात्रा सर्किट- बोधगया, विक्रमशीला, सारनाथ, कुशीनगर, कपिलवस्तू, संकिसा आणि पिपरहवा या क्षेत्रापर्यंत रस्ते विकास केला जात आहे.

औरंगाबाद ते पैठण ६३ किलोमीटरचा महामार्ग
महाराष्ट्रात ओझर पर्यटन १२.७ किमी, लेण्याद्री बुद्ध गुहा २.३ किमी, औरंगाबाद- पैठण ८९० कोटी खर्चून ६३ किमीचा महामार्ग, रायगड- महाड २३७ कोटींचा २५ किमीचा मार्ग, शेगाव- जळगाव जामोद २३६ कोटींचा २९ किमी महामार्ग तसेच शेगाव- पंढरपूर हा रस्ता तयार करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...