आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात वाढणाऱ्या इस्लामिक जिहादी धर्मांधतेच्या अतिरेकी घटनांविरोधात विश्व हिंदू परिषदेची युवा शाखा बजरंगदल आता रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती विहिंपचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी जारी केलेल्या निवेदनातून दिला आहे.
हिंदूंवर जीवघेणे हल्ले
मशिदींमधून बाहेर पडणारे जिहादी धर्मांध सातत्याने हिंदूंची घरे जाळत असून त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करीत आहेत. या हिंसक घटनांच्या विरोधात बजरंगदल गुरुवार, 16 जून रोजी देशभरातील जिल्हा मुख्यालयात धरणे देऊन राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. याची घोषणा करताना विहिंपचे केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी शुक्रवारच्या नमाजनंतर जमाव आणि दंगलखोर बाहेर पडतात अशा मशिदींवर कडक नजर ठेवली पाहिजे, असे आवाहन केले.
तत्काळ अटक करा
जमावाला भडकवणाऱ्यांनाही तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. धमकावले जाणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करून या धमक्या देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी परांडे यांनी केली आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्यां सोबतच जिहादी मानसिकतेचे लोक, मशिदी आणि जमियत-ए-उलेमा-ए-हिंद सारख्या संघटनांनाही जेरबंद केले पाहिजे. ते या दंगलखोरांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करतात, असे परांडे यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.