आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Hindustani Bhau Nagpur Police Notice | Marathi News | Nagpur Police Issues Notice To 'Hindustani Bhau' After Getting Bail From Mumbai High Court; Order To Appear On 22 February

विकास फाटक हाजिर हो..!:जेलमधून सुटल्याच्या दुसऱ्याच दिवशी हिंदुस्तानी भाऊला दणका; आता नागपूर पोलिसांनी दिले हजर राहण्याचे आदेश

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊला गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा हिंदुस्तानी भाऊची अडचणी वाढल्या असून, आता नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला एक नोटीस बजावली आहे.

त्यात 22 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी नागपूरात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. चौकशी दरम्यान गरज भासल्यास नागपूर पोलिससुद्धा हिंदुस्थानी भाऊला अटक करू शकतात. हिंदुस्थानी भाऊला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, आता नागपूर पोलिसांनीसुद्धा नोटीस बजावली असल्याने हिंदुस्तानी भाऊच्या अडचणी पुन्हा वाढल्याचे चिन्ह आहेत.

नेमके काय होते प्रकरण?
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्याव्या या मागणीचे विनंती पत्र शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी देण्यासाठी हिंदुस्थानी भाऊ जात होता. याचा त्याने एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

विद्यार्थ्यांना हजर राहण्याचे आवाहनही त्याने केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या धारावी परिसरात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमा झाले. विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईनच व्हाव्या या मागणीसाठी आंदोलन केले. तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमा झाले. या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे मुंबई पोलिसांनी कारवाई करत हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास फाठकला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?
विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ समाज माध्यमांवर चांगलाच सक्रिय आहे. फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया माध्यमावर तो 'हिंदुस्थानी भाऊ' या नावाने प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 1.4 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर फेसबुकवर 'हिंदुस्थानी भाऊ' या पेजवर 1.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...