आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडाऱ्यात पठाण चित्रपटाला विरोध:हिंदुत्ववादी संघटनांनी केली निदर्शने; सिनेमा गृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत पठाणचे पोस्टर जाळले

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा शहरातील आदर्श सिनेमागृहात बुधवारी पठाण सिनेमा प्रदर्शित झाला. पिक्चरच्या निषेधार्थ गांधी चौकातील आदर्श सिनेमागृहासमोर भंडारा येथील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच, हिंदू रक्षा मंच, भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सिनेमाच्या विरोधात सिनेमा गृहाच्या बाहेर प्रचंड घोषणाबाजी करीत विरोध केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी पठाण सिनेमाचे पोस्टर जाळले आणि शाहरुख खान पोस्टरवर काळी शाही फेकून निषेध नोंदविला. यावेळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. दरम्यान, भंडारा पोलिसांच्या समयसुचकतेने पुढील अनर्थ टळला आणि कार्यकर्त्यांचे आंदोलन शांत झाले.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर "पठाण' चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. चित्रपटात दीपिका, शाहरुख आणि जॉनचे दमदार खतरनाक स्टंट पाहायला गर्दी होत आहे. पण बेशरम रंग या गाण्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

या चित्रपटातील "बेशरम रंग' हे गाणं रिलीज झाल्यापासूनच काही ठिकाणी त्याला कडाडून विरोध करण्यात आला आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या कपड्यांवर आक्षेप घेण्यात आला. सोशल मीडियावरही या सर्व प्रकरणात दोन गट पडलेले होते. यामध्ये काहींनी पठाणला समर्थन दिले आहे तर काहींनी जोरदार विरोध केला आहे. अशातच "पठाण' विरोधात भंडाऱ्यात बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहे. "पठाण' ला सुरुवातीपासूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. आता प्रदर्शना नंतरही विरोध होत आहे. भंडाऱ्यात कार्यकर्त्यांनी पोस्टर्स फाडून निषेध केला.

बातम्या आणखी आहेत...