आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगणघाट:फुलराणी जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला उद्यापासून सुरुवात, जेष्ठ विधितज्ञ उज्वल निकम करणार युक्तीवाद

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेष्ठ विधितज्ञ उज्वल निकम यांच्या उपस्थितीत 426 पानांच्या दोषारोप पत्रावर चालणार कामकाज

प्राध्यापिका तरुणीला जिवंत जाळणारा आरोपी नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. जेष्ठ दिनांक १४ डिसेंबर रोजी विधितज्ञ उज्वल निकम यांच्या उपस्थितीत फुलणारी जळीतकांड प्रकरणाचा युक्तिवाद होणार असून, ४२६ पानांच्या दोषारोप पत्रावर कामकाज चालणार आहेत.

फुलरणीचा जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना दिनांक ३ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात घडली होती. या घटनेचे पडसाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात उमटले होते. आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे यांची वर्धा कारागृहात ओळख परेड घेण्यात आल्यानंतर प्रत्यदर्शी साक्षीदारांनी त्याला ओळखले होते. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला नागपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सद्याच्या स्थितीत आरोपी हा नागपूर येथील कारागृहात बंदिस्त आहेत.

सामाजिक संघटना इतर पक्ष व नागरिकांची ओरड असल्यामुळे आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी या करिता जलद गती न्यायालयात प्रकरण चालविण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधितज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करीत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरिता त्यांची नेमणूक करण्याचे ठरवले होते.

फुलरणीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास हिंगणघाट येथील पोलीस निरीक्षक एस एम बंडीवार यांच्या कडे होता. त्यांनी घटनेत वापरण्यात येणारे सर्व पुरावे गोळा करीत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरीता आरोपीचे दोषारोप पत्र दिनांक २८ फेब्रुवारी रोजी न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयात आरोपीचे ४२६ पानांचे दोषरोप पत्र सादर केल्या नंतर पीडित तरुणीला न्याय मिळावा याकरिता दिनांक १४ डिसेंबर रोजी जेष्ठ विधितज्ञ उज्वल निकम यांच्या उपस्थितीत युक्तिवाद होणार असून, जळीतकांड प्रकरणाचे कामकाज चालणार आहेत.

हिंगणघाट न्यायालयात कामकाजाला सुरुवात
फुलराणी जळीतकांड प्रकरणाचा युक्तिवाद जलदगतीने वर्ध्यातील न्यायालयात होणार होता. मात्र वर्ध्यातील जिल्हा न्यायालयात चालविण्यासाठी परवानगी न मिळाल्याने या प्रकरणाचे कामकाज हिंगणघाट येथे होणार आहेत.

दोषारोप पत्रावर होणार सुनावणी
पीडित या तरुणीनीच्या जळीतकांड प्रकरणाचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले असता, त्या दोषारोप पत्रावर जेष्ठ विधितज्ञ उज्वल निकम सुनावणी देणार त्यानंतर पुढील तारखेला साक्षदारांची साक्ष नोंदविली जाणार. उज्वल निकम यांनी वर्धा न्यायालयात प्रकरण चालवण्याची विनंती अर्ज केला असता,तो अर्ज प्रमुख न्यायाधीशांनी अमान्य करीत हिंगणघाट येथे प्रकरण चालविले जावे अशा सूचना देण्यात आले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser