आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईडी नोटिशीवरून टीका:भाजपा विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीची पीडा हे घाणेरडे राजकारण, गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात यापूर्वी अशा प्रकारचे राजकारण कधीही झालेले नाही : गृहमंत्री

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनानयाने नोटीस पाठवली. तत्पूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनाही ईडीची नोटीस पाठवली. भाजपा विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीची पीडा लावण्याचे घाणेरडे राजकारण सध्या राज्यात खेळले जात असल्याची टीका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्रात यापूर्वी अशा प्रकारचे राजकारण कधीही झालेले नाही, असे ते म्हणाले.

भाजपच्या धोरणांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई करण्याचा सपाटा विरोधी पक्षाने लावला आहे. सीबीआयच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ. त्याबाबत आमचा स्वतंत्र अधिकार आहे. आमच्या परवानगीशिवाय ते महाराष्ट्रात सीबीआयची चौकशी करू शकत नाहीत. ईडीचा अशा पद्धतीने दुरूपयोग करणे अतिषय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण कधीही करण्यात आले नाही. भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासाठी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस दिली आहे. त्यासाठी ते बुधवारी मुंबईला जाणार आहेत. ईडीला भाजपने हातचे बाहुले म्हणून वापरू नये, असे ते गेल्या महिनाभरापासून सांगत आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...