आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हायरस:राज्यातील 17 हजार कैद्यांना तात्पुरते सोडणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्थर रोड कारागृहातील 185 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर घेतला निर्णय

कोरोना संसर्गाचा कारागृहातील कैद्यांना वाढता धोका लक्षात घेऊन राज्यातल्या कारागृहातील एकूण 17 हजार कैद्यांना तात्पुरते सोडण्यात येणार असल्याची माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिली. देशमुख यांनी सांगितले की, आर्थर रोड कारागृहात तब्बल 185 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इतर कारागृहांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 17 हजार कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

5 हजार अंडरट्रायल, 7 वर्षाच्या आत शिक्षा झालेले 3 हजार आणि त्यावरील शिक्षा झालेले 9 हजार कैदी. यात बलात्कार आर्थिक घोटाळे, मोका, टाडा, एमपीआयडी या गंभीर गुन्ह्यातील कैद्यांचा समावेश राहणार नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले.

बातम्या आणखी आहेत...