आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकाऱ्याला निरोप:नागपूरात तुकाराम मुंडेंना निरोप द्यायला आले शेकडो लोक, फुलांचा केला वर्षाव; बदली रोखण्यासाठी रस्त्यावर उतरुन केली घोषणाबाजी

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुकाराम मुंडेंना निरोप देण्यापूर्वी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
  • नागपूर सोडण्यापूर्वी मुंडेंनी फेसबुकवर एक व्हिडिओ संदेश जारी करत आठवणींनी दिला उजाळा

असे फारच क्वचित घडते की, एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला निरोप देण्यासाठी शेकडो लोक रस्त्यावर येतात. असेच काहीसे चित्र नागपुरमध्ये पाहायला मिळाले. महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांची काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सचिवपदी बदली झाली.

तुकाराम मुंडेंना निरोप देताना नागरिकांचे डोळे पाणावले
तुकाराम मुंडेंना निरोप देताना नागरिकांचे डोळे पाणावले

मुंडेंच्या बदलीमुळे नागपुरातील जनता नाराज झाली आणि आज मुंडेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. लोकांनी मुंडेंवर फुलांचा वर्षाव करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि सरकारला त्यांची बदली थांबविण्याची विनंती केली. यावेळी तुकाराम मुंडेंच्या चाहत्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली.

तुकाराम मुंडेंची बदली थांबविण्यासाठी शेकडो लोकांनी त्यांच्या घराबाहेर निदर्शने केली.
तुकाराम मुंडेंची बदली थांबविण्यासाठी शेकडो लोकांनी त्यांच्या घराबाहेर निदर्शने केली.

तुकाराम मुंडे नागपूर मनपाचे एक लोकप्रिय अधिकारी होते. नागपूर स्मार्ट सिटी प्रोजेक्टची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांच्यावर आरोप लावला होता. केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची बदली झाली. त्यांच्या जाण्याने शहराच्या विकासाची गती ठप्प होईल, असे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे.

मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर 2 तास गोंधळ सुरू होता.
मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर 2 तास गोंधळ सुरू होता.

फेसबुकवर लिहिले - आपल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन

नागपूर सोडण्यापूर्वी तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडिओ संदेश जारी केला. यात ते म्हणाले की, "गुडबाय एनएमसी. नागपुरवासियांचे आभार." याशिवाय त्यांनी आपल्या काही अनुभव देखील या व्हिडिओत शेअर केले आहेत.

व्हिडिओ संदेशात ते म्हणाले...

  • नुकतंच कोव्हिड विषाणूच्या संक्रमणातून मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या प्रति असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.
  • नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकवणारा ठरला. कोव्हिड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही.
  • जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला गुडबाय. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद!
मुंडे यांचे अनेक चाहते त्यांच्या गाडीसमोर बसले होते आणि तेथून हटण्यास तयार नव्हते.
मुंडे यांचे अनेक चाहते त्यांच्या गाडीसमोर बसले होते आणि तेथून हटण्यास तयार नव्हते.